पुणे – शहरात आज नव्याने 1 हजार 700 करोना बाधित सापडले आहेत. तर दिवसभरात 1 हजार 545 बाधित करोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत करोनामुळे 50 जणांचा मृत्युची नोंद झाली असून, त्यातील शहर हद्दीतील 38 तर अन्य जिल्ह्यातील 12 जणांचा समावेश आहे.
शहरात गेल्या चार दिवसांपासून सात ते साडेसात हजारांपर्यंत दररोज होणारी नमुने तपासणी संख्या साडेपाच ते सहा हजारांपर्यंत खाली आली आहे. जवळपास एक ते दीड हजारांनी तपासणी संख्या कमी झाली आहे.
रविवारी (दि. 20) दिवसभरात 6 हजार 67 संशयितांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत तब्बल 5 लाख 74 हजार 932 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 1 लाख 31 हजार 781 जणांना करोनाची लागण झाली आहे.
त्यातील 1 लाख 10 हजार 916 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. शहरात सध्या 17 हजार 781 बाधित सक्रिय असून, त्यातील 961 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 494 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे, तर 467 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.