गणेशोत्सवात पीएमपीच्या 170 जादा बस

File photo...

पुणे – गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. त्यांच्यासाठी पीएमपी 170 जादा बसेस सोडणार आहे.
गणेशोत्सवात दि.5 ते 12 सप्टेंबरदरम्यान या जादा बस धावणार आहेत. शहरातील काही मुख्य रस्ते सायंकाळी 6 नंतर बंद ठेवण्यात येणार असल्याने नियमित मार्गांत बदल करण्यात आलेले आहेत. यामध्ये, प्रामुख्याने शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्तावरुन होणाऱ्या संचलनात बदल करण्यात आला आहे.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान स्वारगेट बसस्थानकातून बस सुटण्याची ठिकाणेही बदलण्यात आली आहेत. याचबरोबर, स्वारगेट ते निगडी या मार्गावर रात्रीच्या सुमारास जादा बस सोडण्यात येणार असल्याची, माहिती पीएमपी प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे भाविकांना दिलासा मिळणार आहे.

रात्री 1 वाजेपर्यंत मिळणार बससेवा
पीएमपीची रात्री 10 ते 1 वाजेपर्यंतचे संचलन बसची खास सेवा म्हणून राहणार आहे. या सेवेसाठी रात्री दहा नंतर पीएमपीने तिकीट दरामध्ये पाच रुपयांची वाढ केलेली आहे. यामध्ये, पास धारकांना रात्री 12 वाजेपर्यंत सूट देण्यात आली असून त्यानंतर एक तास कोणत्याही प्रकारचे पास चालणार नाहीत.

स्थानक आणि धावणाऱ्या बसेस
स्वारगेट – धनकवडी, भारती विद्यापीठ, आंबेगाव, अपर इंदिरानगर, पुणे स्टेशन, सांगवी, आळंदी
हडपसर गाडीतळ – स्वारगेट, पुणे स्टेशन, मनपा भवन, सासवड, मांजरी, फुरसुंगी,
मनपा भवन – भोसरी, चिंचवड, निगडी, देहूगांव, विश्रांतवाडी, पाषाण, सुतारवाडी, बालेवाडी, तळेगाव दाभाडे, प्राधिकरण
डेक्कन – कर्वेनगर, मळवाडी, गोखलेनगर, कोथरुड डेपो
सिंहगड रस्ता – वडगाव, धायरी, खानापूर

देखावे पाहण्यासाठी येणाऱ्यांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्यात येत आहेत. वाहतूक विभागाने केलेल्या पर्यायी मार्गावरुनच बस धावतील. प्रवाशांची संख्या लक्षात घेता बसची संख्या वाढविण्यात येणार आहे.
– सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)