शिरूर -शिरूर शहरातील विविध भागांत 17 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील करोनाबाधितांची संख्या 142 झाली आहे.
यामध्ये शहरातील भाजी बाजार येथील 37, 38 व 72 वर्षीय पुरुष तर 45 वर्षीय महिला, गुजरमळा येथील 44 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय मुलगा, साईनगर येथील 40 वर्षीय पुरुष, कैकाडीआळी 40 वर्षीय पुरुष, सरदार पेठ 30 वर्षीय पुरुष, रेव्हेन्यू कॉलनी महिला, पुरुष, हुडको कॉलनी पुरुष, महिला, सिध्दार्थ नगर पुरुष, मुंबई बाजार येथे 1 महिला व 1 पुरूष, शिरूर शहर 1 असे 17 रुग्ण आढळले आहेत.