बारामती (प्रतिनिधी) – दिवसभरात 17 संक्रमित रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णांची संख्या 165 वर पोहोचली आहे. मृत्यूची संख्या पंधरा झाली आहे. तर 73 जण उपचार घेऊन घरी गेले आहेत.
एकूण 96 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी सतरा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ग्रामीण भागातील 8 व शहरातील नऊ असे रुग्ण आहेत. बारामतीची रुग्ण संख्या एकूण 165 झाली आहे. कांबळेश्वर येथील 1 युवक व पारवडी,राजबाग काळखैरेवाडी येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 3 रुग्ण गुणवडी येथील बारामती हॉस्पिटलमधील पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील 2, होळ येथील एकाचा समावेश आहे.
शहरातील पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये जाधव वस्ती फलटण रोड येथील 2, पाटस रोड येथील 1, दाते पेट्रोल पंपाशेजारील 1 व समर्थनगर येथील 1, रुई येथील 2, तांबेनगर येथील 1, जाधव वस्ती फलटण रोड 1 जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माळेगाव येथील पूर्वी पॉझिटिव्ह रुग्णाला पुणे येथे उपचारासाठी नेताना मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या पंधरा झाली आहे. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या 73 इतकी आहे.