इजिप्त मध्ये 17 गनिमांची पोलिसांकडून हत्या

केैरो – इजिप्तच्या उत्तर सिनाई भागात पोलिसांनी तेथील गनिमांवर व्यापक कारवाई करून 17 गनिमांना कंठस्नान घातल्याचे वृत्त आहे. हे गनिम इस्लामिक कट्टरपंथीय संघटनेचे आहेत. सिनाई प्रांताची राजधानी अल आयरीश येथे एकेठिकाणी काहीं संशयित गनिम दडून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या भागाला घेरून ही कारवाई केली. हे गनिम काही घातपाती कारवाया करण्याचे प्लॅनिंग करीत होते. व त्यासाठी त्यांनी आपल्या अड्ड्यावर शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचाही साठा करून ठेवला होता.

ईजिप्त मध्ये सन 2013 पासून इस्लामिक स्टेटचे गनिम सरकारी फौजांच्या विरोधात लढत आहेत. त्यामुळे तेथे अनेक वेळा रक्तरंजीत चकमकी झाल्या आहेत. सरकारने या गनिमांच्या हालचालींवर बऱ्याच अंशी नियंत्रण आणले असले तरी अजूनही या गनिमी कारवाया तुरळक प्रमाणात सुरूच आहेत. याच गनिमांनी सिनाई प्रांतातील गॅस पाईप लाईन उडवून देण्याचा प्रकार घडला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.