दिल्ली आग दुर्घटनेत 17 जणांचे बळी

करोल बागेतील हॉटेलला वेढले आगीने

नवी दिल्ली : दिल्लीत करोलबागेतील एका हॉटेलला लागलेल्या आगीत सतरा जण ठार झाले तर अन्य अनेक जण जखमी झाले आहेत. अरप्रित पॅलेस नावाचे हे हॉटेल करोलबागेतील गुरूद्वारा रस्त्यावर आहे. तेथे आज पहाटे 4 वाजून 35 मिनीटांनी ही आग लागली. आगीचे स्वरूप मोठे असल्याने ती विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे 24 बंब तेथे पाठवण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आगीत अडकलेल्यांना बाहेर काढून तीन रूग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले. आगीपासून बचाव करण्यासाठी काही जणांनी त्या इमारतीवरूनही उड्या मारल्याने ते जखमी झाले आहेत. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून दोन जणांनी उड्या टाकल्या त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. हॉटेलचे दरवाजे आणि खिडक्‍यांना लाकडी पॅनेल्स बसवण्यात आली होती त्यामुळे ही आग अन्यत्र वेगाने पसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुख: व्यक्त केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)