देशात आतापर्यंत 17.70 कोटी लोकांना लस; जागतिक स्तरावर सर्वात जलद व्हॅक्‍सिनेशन करणारा देश ठरला भारत

नवी दिल्ली, दि. 13 – देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या करोना लसीच्या डोसची संख्या 17.70 कोटींहून अधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, जागतिक स्तरावर सध्या भारत सर्वात जलद व्हॅक्‍सिनेशन करणारा देश आहे.

भारतात 17 कोटी लसीचे डोस 114 दिवसांमध्ये देण्यात आले आहेत. तसेच हा आकडा गाठण्यासाठी चीनला 119 दिवसांचा कालावधी लागला होता आणि अमेरिकेने हे लक्ष्य 115 दिवसांमध्ये गाठले होते.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, 18 ते 44 वयाच्या 4,17,321 लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाल्यानंतर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लसीचे डोस घेतलेल्या एकूण लोकांची संख्या 34,66,895 झाली आहे.
देशात देण्यात आलेल्या कोविड लसीच्या डोसची एकूण संख्या 17 कोटी 70 लाख 85 हजार 371 झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.