पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज 168 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 127 बाधित बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज शहरात 168 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 2 लाख 72 हजार 964 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात मागील एक बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात आणखी एका बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील 4420 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरामध्ये 127 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 68 हजार 126 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 6864 जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 393 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 752 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1145 इतकी आहे.