160 स्कूलबस थांबे जिल्ह्यात निश्‍चित

पुणे – पुणे जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या बैठकीमध्ये दि. 31 जुलैपर्यंत स्कूलबसचे थांबे निश्‍चित करावे, अशी सूचना समितीचे अध्यक्ष पोलीस आयुक्‍त डॉ. के.व्यंकटेशम्‌ यांनी दिली होती. यानुसार पुणे जिल्ह्यातील 160 थांब्यांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने परिचलन पद्धतीने दि. 31 जुलै रोजी मंजुरी दिली.

महाराष्ट्र मोटार वाहन नियमानुसार स्कूलबस आणि स्कूल व्हॅनसाठी थांबे निश्‍चित करण्याचे आदेश दिले होते. यानुसार पुणे जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक दि. 3 जुलै रोजी झाली होती. त्यामध्ये बसचे थांबे निश्‍चित करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या होत्या.

मंजुरी मिळालेले थांबे
प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे – 108
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड – 39
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती – 13

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.