बाईफ रोड परिसरात 16 वर्षीय तरुणी पॉझिटिव्ह

वाघोली -येथील बाईफ रोडच्या संभाजीनगर परिसरामध्ये वास्तव्यास असणाऱ्या 37 वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या तिघांच्या केलेल्या टेस्टमध्ये त्याच्या 16 वर्षाच्या मुलीचा रिपोर्ट बुधवारी (दि.27) पॉझिटिव्ह आला आहे.

मुलीला पुढील उपचारासाठी पुणे शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. वाघोलीमध्ये आत्तापर्यंत 14 रुग्ण सापडले असून यापैकी 7 जण बरे होऊन घरी परतले आहेत.

सद्यस्थितीत 7 ऍक्‍टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे माजी उपसरपंच समीर भाडळे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.