मुंबई उपनगरात 16 हजार लीटर अनधिकृत दारू जप्त 

– महिन्याभरात 142 प्रकरणे, 128 व्यक्तींना अटक, तर 5 वाहने जप्त

मुंबई – लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी गेल्या महिनाभरात केलेल्या विविध कारवाईत मुंबई उपनगरातून आतापर्यंत 18 लाख 3 हजार 544 रूपये किमतीची सुमारे 16 हजार 64 लीटर दारूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणांमध्ये 128 व्यक्तिंना अटक करण्याबरोबरच 5 वाहनेही जप्त केली आहेत.

‘लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्वस्तरीय कार्यवाही सातत्याने वऐ नियमितपणे करण्यात येत आहे. याच कार्यवाहीचा भाग म्हणून राज्य उत्पादन शुल्क खात्याद्वारे मुंबई उपनगर जिल्ह्यात 11 मार्च ते 15 एप्रिल 2019 या कालावधीत विविध 142 प्रकरणी सुमारे 18 लाख 3 हजार 544 रुपये इतक्‍या किमतीचा सुमारे 16 हजार 64 लीटर एवढा अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

यामध्ये 617 लीटर हातभट्टीची दारु, 13 हजार 200 लीटर इतक्‍या प्रमाणातील मद्य निर्मितीसाठी वापरले जाणारे ‘वॉश’ रसायन, 524.28 लीटर देशी मद्य, 218.63 लीटर विदेशी मद्य, 251.87 लीटर बीअर, ताडी 1,194 लीटर व इतर प्रकारचे 60.2 लीटर मद्य पदार्थांचा समावेश आहे. तसेच या अनुषंगाने 128 व्यक्तींना अटक करण्यात आली असून अंदाजे रुपये 2 लाख 55 हजार किमतीची 5 वाहने देखील जप्त करण्ऐयात आली आहेत, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.