आरक्षित प्रवेशासाठी राज्यभरातून 16 हजार अर्ज

पुणे – शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत 25 टक्‍के आरक्षित प्रवेशासाठी दोन राज्यभरात 16 हजार 345 जणांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. पुणे जिल्ह्यात यंदा 972 शाळांमध्ये प्रवेशाच्या तब्बल 17 हजार 57 जागा उपलब्ध असून या जागांसाठी 2 हजार 178 अर्ज आल्याचे दिसून येत आहे.

गतवर्षी राज्यात 9 हजार 195 शाळांनी नोंदणी केली होती. या शाळांमध्ये प्रवेशासाठी 1 लाख 16 हजार 809 जागा उपलब्ध होत्या. तर यंदा 9 हजार 328 शाळांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे तब्बल 133 शाळांची अधिक नोंदणी झाली असल्याचे दिसून येत आहे. मात्र या शाळांमध्ये प्रवेशाच्या 1 लाख 15 हजार 191 जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 1 हजार 618 जागा कमी झाल्याचे दिसून येत आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर 21 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या काळात शाळांना नोंदणी करण्याची संधी देण्यात आल्यानंतर सुरूवातीच्या टप्प्यात शाळांनी नोंदणीस प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर शिक्षण विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देवून दोन वेळेस मुदतवाढ दिली. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 133 शाळांची अधिक नोंदणी झाली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवेशाच्या जागांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे प्रवेशाच्या जागांची संख्या वाढण्याऐवजी कमी झाल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here