डिझेलच्या दरात 16 पैसे वाढ

नवी दिल्ली – चार दिवसांच्या विश्रांतीनंतर देशातील इंधनाचे दर पुन्हा वाढले आहेत. आज डिझेलच्या दरात प्रति लिटर 16 पैसे इतकी वाढ झाली. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर 81 पैसे इतका झाला. पेट्रोलच्या दरात मात्र कोणताही फेरबदल आज झाला नाही.

दिल्लीत पेट्रोलचा दर 80 रुपये 43 पैसे इतका कायम राहिला आहे. या दरांमध्ये प्रत्येक राज्यांतील व्हॅट व सेल्स टॅक्‍स दरांनुसार फरक आहे. डिझेलचा दर या आधी 7 जुलै रोजी वाढला होता तर पेट्रोलचा दर मात्र 29 जून पासून कायम आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.