16 वर्षाखालील नॅशनल सिरीज टेनिस स्पर्धा : शरण्या गवारे, क्रिश पटेल यांना विजेतेपद 

पाचगणी – रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्‍ससनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षाखालील नॅशनल सिरीज्‌ टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या शरण्या गवारे हिने तर, मुलांच्या गटात गुजरातच्या क्रिश पटेल या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले. दुहेरीत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या गार्गी पवार व गुजरातच्या भक्ती शहा या जोडीने विजेतेपद पटकावले.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात अंतिम फेरीतपाचव्यामानांकित लक्ष्यचा पाठिंबा लाभलेल्या शरण्या गवारेने आपली विजयी मालिका कायम ठेवत विपाशा मेहराचा 6-2, 4-2 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. 1तास 20मिनिटे चाललेल्या या सामन्यात शरण्याने सुरेख सुरुवात विपाशाचीपहिल्याच गेममध्ये सर्व्हिस रोखली. या सेटमध्ये शरण्याने आपले वर्चस्व कायम राखत पाचव्या गेममध्ये विपाशाची सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-2असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला आक्रमक खेळ केला व स्वतःच्या सर्व्हिस राखल्या. सामन्यात 4-2 अशी स्थिती असताना विपाशाला बरे वाटू न लागल्यामुळे तिने सामन्यातून माघार घेतली. शरण्या गवारे हि पीवायसी हिंदू जिमखाना येथे प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत चौथ्या मानांकित गुजरातच्या क्रिश पटेल याने दुसऱ्या मानांकित दिल्लीच्या सुशांत दबसचा 6-4, 6-3असा संघर्षपूर्ण पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. दुहेरीत मुलांच्या गटात दिवेश गेहलोट याने सुशांत दबसच्या साथीत फैज नस्याम व आर्यन भाटियाचा टायब्रेकमध्ये 7-6(4), 6-4असा पराभव करून विजेतेपद मिळवले. मुलींच्या गटात गार्गी पवार व भक्ती शहा या जोडीने संजना सिरीमल्ला व सृजना रायाराला यांचा 6-4, 6-1असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना प्रशस्तिपत्रक व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण लगान व जोधा अकबरमधील अभिनेता अमिन हाजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक जावेद सुनेसरा व वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 16 वर्षाखालील मुली: अंतिम फेरी:
शरण्या गवारे(5) वि.वि.विपाशा मेहरा 6-2, 4-2 सामना सोडून दिला;
मुले- क्रिश पटेल(4) वि.वि.सुशांत दबस (2) 6-4, 6-3;
दुहेरी गट: उपांत्य फेरी: मुले:
दिवेश गेहलोट/सुशांत दबस(1) वि.वि. अर्णव पतंगे/चेतन गडियार (4)6-4, 6-2;
फैज नस्याम/आर्यन भाटिया वि.वि. उदित गोगोई/नितीन सिंग (2)6-3, 6-4;
अंतिम फेरी: दिवेश गेहलोट/सुशांत दबस वि.वि. फैज नस्याम/आर्यन भाटिया 7-6(4), 6-4;
मुली: उपांत्य फेरी:
संजना सिरीमल्ला/सृजना रायाराला वि.वि. भूमिका त्रिपाठी/वैष्णवी आडकर 6-1, 6-2;
गार्गी पवार/भक्ती शहा वि.वि. दिव्या भारद्वाज/स्वरदा परब 6-4, 6-3;
अंतिम फेरी: गार्गी पवार/भक्ती शहा वि.वि. संजना सिरीमल्ला/सृजना रायाराला 6-4, 6-1.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)