16 मिनिटात 3 भारतीय अंतराळात जाऊ शकतील

2022 मध्ये मानवासह अंतराळ मोहिमेचा आराखडा “इस्रो’कडून जाहीर

नवी दिल्ली – भारतीय अंतराळ संस्था अर्थात “इस्रो’च्या मानवाला अंतराळात पोहोचवण्याच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत देशभरातून 3 भारतीयांची निवड केली जाणार आहे. या तिघा भाग्यवान भारतीयांना 16 मिनिटांमध्ये अंतराळात स्थिर ठिकाणी पोहोचवले जाऊ शकेल, असे “इस्रो’चे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले. हे तिघेही अंतराळवीर 5 ते 7 दिवस अंतराळामध्ये घालवणार आहेत. “गगनयान’ ही मोहिम 2022 पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. तोपर्यंत ही मोहिम निश्‍चितच सुरू होईल, असा विश्‍वासही सिवन यांनी व्यक्‍त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवी दिल्लीत “गगनयान’ मोहिमेसंदर्भात सिवन यांनी विस्तृत सादरीकरण केले. याप्रसंगी अणूउर्जा आणि अंतराळ खात्याचे राज्य मंत्री जितेंद्र सिंह हे देखील उपस्थित होते. मानवाला बरोबर घेऊन अंतराळात जाण्याच्या मोहिमेमध्ये “क्रू मॉड्युल’ आणि “सर्व्हिस मॉड्युल’ अशी दोन मॉड्युल तयार केली जातील. ही दोन्ही मॉड्युल मिळून अंतराळ मॉड्युल तयार केले जाईल. “जीएसएलव्ही एमके3′ च्या अद्ययावत रॉकेटवर हे मॉड्युल बसवले जाईल.

श्रीहरीकोटा येतून अंतराळात सोडल्यावर 16 मिनिटांमध्ये पृथ्वीपासून 300 ते 400 किलोमीटर उंचीवर हे रॉकेट जाईल. या उंचीवर मॉड्युलमधील सदस्य सूक्ष्म गुरुत्वाकर्षण बलाच्या आधारे काही संशोधन कार्य करतील.

पृथ्वीवर माघारी येताना हे मॉड्युल परतीचा मार्ग बदलून येईल. पृथ्वीपासून 120 किलोमीटर अंतरावर “क्रू मॉड्युल’ आणि “सर्व्हिस मॉड्युल’ एकमेकांपासून वेगळे होतील आणि पॅरेशूटच्या सहाय्याने वेग मंदावलेले “क्रू मॉड्युल’ पृथ्वीवर उतरेल, असे सिवन यांनी सांगितले. गुजरतच्या किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात हे “क्रू मॉड्युल’ उतरेल. या दरम्यान काही तांत्रिक अडचण आल्यास “क्रू मॉड्युल’ बंगालच्या उपसागरामध्ये उतरेल. “मॉड्युल’मधून सर्व सदस्य 20 मिनिटात बाहेर पडतील.
मानवासह अंतराळ मोहिम 2022 मध्ये होईल. त्याच्या पूर्वतयारीसाठी आगामी 30 महिन्यात मानवरहित अंतराळ मोहिम राबवली जाईल, असेही सिवन यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)