पुणे – सामाजिक कार्यकर्ते अरूणशेठ भोसले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 151 जणांनी रक्तदान केले. अरूणशेठ भोसले आणि शिवलालशेठ भोसले यांच्या मित्र परिवाराच्या वतीने रविवारी (दि.3) सकाळी मार्केट यार्डातील श्री शारदा गजानन मंदिर येथे या शिबिराचे आयोजन केले होते.
शिबिरामध्ये रक्तदान केलेल्या प्रत्येक व्यक्तीला फळाची टोपली देण्यात आली. तर, 51 गरजूंना अन्नधान्याच्या कीटचे वाटप करण्यात आले.
अनिरूध ऊर्फ बाप्पू भोसले, अनिकेत भोसले, विलास थोपटे, रामदास गायकवाड, किरण ननावरे, संजय वखारे, तानाजी चौधरी, नितीन जामगे, राजू सुर्यवंशी आणि गणेश यादव यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी श्रम घेतले. यावेळी अनेकांनी अरूणशेठ भोसले यांच्या आठवणी सांगितल्या.