भिगवण-करोनाच्या साथीने उच्चांक गाठला असतानाही नागरिकांनी मात्र मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे याबाबत फारसे गांभीर्य दाखविल्याचे चित्र नाही.
याबाबत भिगवण ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत 157 लोकांना दंड करीत 31 हजार 400 रुपयांचा रक्कम जमा करण्यात आली आहे.
सहायक फौजदार रतिलाल चौधर व भिगवणचे ग्रामसेवक हनुमंत चांदगुडे यांनी कारवाईस सुरुवात केली. भिगवणसह तक्रारवाडी, मदनवाडी, डिकसळ गावांमध्ये कारवाई होत आहे.