यवत -सोलापूर – पुणे महामार्गावर यवत (ता. दौंड) येथील हद्दीत सकाळी साडेसहाच्या सुमारास गोरक्षकांनी टेम्पोमधून 1 हजार 500 किलो गोमांस इंदापूर येथून पुणे येथे जाताना तो टेम्पो पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी गोरक्षक प्रतीक विक्रम भेगडे (वय 22, रा. शनिवारपेठ भेगडे आळी, मावळ), यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. टेम्पोचालक रफिक बेपारी (रा. इंदापूर), रज्जाक बेपारी व चीना (पूर्ण नाव माहित नाही) अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
टेम्पोचालक रफिक बेपारी हा टेम्पोमधून इंदापूर येथून गाई व बैलांचे सुमारे 1 हजार 500 किलो गोमांस घेऊन तो पुणे येथे घेऊन जात होता. टेम्पो यवत हद्दीत आला असता गोसेवा रक्षक भेगडे, उपेंद्र बलकवडे, शिवांकुर खेर यांनी टेंपो अडवून पाहणी केली.
टेम्पोचालक हा गोमांस वाहतूक करीत असल्याचे आढळले. यानंतर टेम्पो पोलिसांच्या ताब्यात देत प्रतीक भेगडे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार शैलेश लोखंडे करीत आहेत.