नऱ्हे सन युनिव्हर्स सोसायटीत 150 जणांनी केले रक्‍तदान

नऱ्हे  – येथील सन युनिव्हर्स सोसायटीत महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त नगरसेविका राजश्री नवले यांच्या पुढाकारातून रक्‍तदान शिबिर आयोजित करण्यात आले. त्याचे उद्‌घाटन आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते झाले.

लायन्स क्‍लब, पुणे यांच्यावतीने आयोजित या शिबिरात 150 जणांनी रक्‍तदान केले. नगरसेविका राजश्री नवले, माजी नगरसेवक बाळासाहेब नवले, लायन मुखर्जी, प्रोजेक्‍ट चेअरमन आर. के. शाह, सहायक पोलीस आयुक्‍त किशोर जाधव, सोसायटीचे चेअरमन प्रदीप नवले, उपसरपंच राजाभाऊ कोंडे आदी उपस्थित होते. संयोजन सारंग नवले, करण नवले, प्रकाश बाबर, गणेश राठोड, संदीप लडकत यांनी केले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.