दुबई – दुबईत रहात असलेल्या मराठमोळ्या रिवा तुळपुळे या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने तब्बल 25 टन इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची विल्हेवाट लावली आहे. 2016 मध्ये तिने घरातील मोडलेल्या डिव्हाईसवरून तीने डुई केअर डीबीएक्स ही मोहीम सुरू केली.
याबाबतचे वृत्त गल्फ न्यूज या प्रख्यात दैनिकाने दिले आहे. “”मी माझ्या आईला विचारले की, या डिव्हाईसची विल्हेवाट का लावत नाही. त्यावर आईनं मला सांगितलं, त्यासाठी काही विशिष्ट प्रक्रिया काराव्या लागतात. त्याची पुरेशी माहिती आपल्याकडे नाही. त्यामुळे त्याची उत्सुकता वाढली. त्यासाठी काही संशोधन करण्याची गरज वाटू लागली. त्याचा फेरवापर किंवा विल्हेवाट लावण्याची माहिती नसल्याने अनेक जण त्या वस्तू साध्या कचऱ्यात टाकून देतात.
समाज माध्यमांतून आणि मौखिक पध्दतीने त्याबाबत जनजागृती करत “वुई केअर डिएक्सबी’ या मोहीमेने विद्यार्थी, व्यावसायिक, सामान्य नागरिकांच्या कार्यकर्त्यांची एक यादी बनवली. त्यानंतर दुबई स्थित “एन्व्हायरो सर्व’ या इलेक्ट्रॉनिक रिसायकल आणि प्रोसेसर संस्तेशी संपर्क साधला. आणि त्यांच्याकडे या वस्तू सोपवल्या.
रिवाने डिसेंबरमध्ये अखेरचा इ कचरा गोळा केला होता. त्यात प्रिंटर,मोबाइरल, मोडलेले लॅपटॉप. कि बोर्ड अशा दोन हजार वस्तूंचे वाटण्यात आल्या. या दहा दिवसांच्या मोहिमेत 15 शाळांतील 60 विद्यार्थी सहभागी झाले होते.
हीच ती रिवा –
दोन वर्षापुर्वी पॅडमन चित्रपट आला होता. त्यावेळी दुबईत आठवीत शिकणाऱ्या रिवाने मैत्रिणींकडून पैसे गोळा करून शहापूर तालुक्यात 250 मुलींना सॅनेटरी नॅपकीन वाटप केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचे कौतूक केले होते.