मुंबई – भारताचा 15 वर्षीय ग्रॅंडमास्टर डी. गुकेशने मेनोर्का खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत जॉर्जियाच्या निनो बात्सिएश्विलीला पराभूत केले. या विजयानंतर गुकेशचे एलो 2651.4 गुण झाले असून जागतिक क्रमवारीत त्याने अव्वल 100 बुद्धिबळपटूंमध्ये झेप घेतली आहे. ही कामगिरी करणारा तो सर्वात युवा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल 100 बुद्धिबळपटूंमध्ये प्रवेश मिळवणारा सर्वात युवा भारतीय खेळाडू ठरताना गुकेशने पाच वेळा विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदचा विक्रम मोडीत काढला आहे.
आनंदने सप्टेंबर 1987मध्ये ही कामगिरी केली होती. त्यावेळी तो 17 वर्षांचा होता. जागतिक क्रमवारीत अव्वल 100 बुद्धिबळपटूंमध्ये सध्या गुकेश आणि आनंदसह एकूण सात भारतीयांचा समावेश आहे.