पानीपत : हरीयाणातील पानिपत येथे एका 15 वर्षाच्या मुलीवर धावत्या मोटारीत दोघांनी सामुहिक बलात्कार केला. त्यांना अटक करण्यात आली आहे.
11वीत शिकणारी ही मुलगी एका बागेजवळ बेशुध्दावस्थेत आढळली होती. तिला शुक्रवारी रात्री खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत वापरण्यात आलेली मोटार जप्त करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता आणि पोस्को कायद्याच्या विविध कलमांखली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या तरूणांनी तिला वाढदिवस साजरा करण्यासाठी निमंत्रित केले होते. तेथे मोटारीत तिला जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर तीची शुध्द हरपली. दोघांनी तिला मोटारीतून नेले. तिच्यावर धावत्या मोटारीत बलात्कार केला, असे पोलिसांनी सांगितले.