नाशिक – क्रिकेट खेळताना अचानक चक्कर आल्याने एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. श्रेयस सुधीर ढोरे असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना नाशिक येथील नवीन नाशिक येथे घडली.
श्रेयस आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. डोक्यावर उनही होते. त्यातच तो चक्कर येऊन खाली कोसळला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला सावलीत नेले. साधी चक्कर आली असेल म्हणून त्याच्या तोंडावर पाणी मारले. मात्र तो काहीही प्रतिसाद देत नव्हता. त्यानंतर तात्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डाॅक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.