सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील १५ जणांचे करोना रिपोर्ट मंंगळवारी रात्री उशिरा पाँझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या आता ५७१ झाली आहे. कोळकी येथील एका करोनाबाधिताचा म्रुत्यू झाला आहे.
मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार कोरेगाव तालुक्यातील कटापूर येथील ६२ वर्षीय पुरुष, २४ व ५५ वर्षीय महिला, जावळी तालुक्यातील वहागाव येथील ३४ वर्षीय पुरुष, काटवली येथील २९ वर्षीय पुरुष व ५६ वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील वावदरे येथील ४५ वर्षीय महिला, माणगाव-अतित येथील ३५ वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील जांभेकरवाडी येथील २ वर्षीय बालक, दिवशी मारुली येथील २९ वर्षीय पुरुष, नवसारी येथील ५५ वर्षीय सारी आजाराचा पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील ५५ वर्षीय महिला, माण तालुक्यातील दहिवडी येथील १९ वर्षीय युवक, कराड तालुक्यातील तुळसण येथील ६२ वर्षीय सारी आजाराचा पुरुष, फलटण तालुक्यातील कोळकी येथील ५४ वर्षीय सारी आजाराचा पुरुष, अशा एकूण १५ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
३ जणांचा मृत्यु पश्चात अहवाल निगेटिव्ह
वाई तालुक्यातील ८५ वर्षीय महिला, गिरवी ता. फलटण येथील ६५ वर्षीय महिलेचा व वेळेकामती ता. सातारा येथील ५९ वर्षीय पुरुषाचा मृत्यूपश्चात घेण्यात आलेला नमुना निगेटिव्ह आला आहे.
कोळकी येथील एका करोना बाधिताचा मृत्यु
फलटण तालुक्यातील कोळकी येथे मुंबईवरुन प्रवास करुन आलेला ५४ वर्षीय करोनाबाधितचा मृत्यू झाला आहे.
२०८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार २०८ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले. मुंबई येथे खासगी प्रयोगशाळेत तपासणी करुन आलेल्या दिवड ता. माण येथील २९ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांना क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरु आहेत.