दिवसभरात १५ नवे रुग्ण; राज्यात १२२ कोरोनाग्रस्त

मुंबई – नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूची लागण झालेले आणखी ६ रुग्ण सापडले असून यामुळं राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १२२ झाली आहे. या ६ रुग्णांपैकी ५ रुग्ण हे मुबईतील तर १ रुग्ण ठाणे परिसरातील असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलीये.

दरम्यान, आज दुपारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यामध्ये ९ नव्या रुग्णांसह कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ११६ वर पोहचली होती. यामध्ये सांगलीतील एकाच कुटुंबातील पाच तर मुंबईतील चौघांचा समावेश होता. आता मुंबई व ठाणे परिसरामध्ये ६ रुग्ण आढळल्याने ही संख्या १२२ वर पोहोचली आहे.

राज सरकार सध्या कोरोना विषाणू संकटाचा सामना करण्यासाठी राज्यभरामध्ये युद्ध पातळीवर उपाययोजना राबवत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी देखील सरकारी निर्णयांचे पालन करून मदत करणे आवश्यक आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.