उत्तर प्रदेशातील दोन अपघातात 15 ठार

फतेहपूर: उत्तर प्रदेशमध्ये बुधवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात सुमारे 15 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 36 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्‍टरांकडून देण्यात आली आहे.

फतेहपुर येथे बुधवारी सकाळी झालेल्या दुर्घटनेत सात जण ठार, तर 25 जण जखमी झाले. ही दुर्घटना बिलारी-कुन्हा मोध मार्गावर खासगी बस आणि ट्रक यांच्यात धडक झाल्याने घडली. खासगी प्रवासी बस ही फतेहपुरवरून जहानाबादला जात होती. यात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद चंदपुर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
दुसरी दुर्घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास संभल जिल्ह्यातील मोरादाबाद-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर घडली. एक खासगी प्रवासी वाहन उलटल्याने झालेल्या अपघातात 8 जण ठार, तर 11 जण जखमी झाले. हे प्रवासी वाहन एका लग्नावरून परत येत असताना लेहरवान गावाजवळ अपघातग्रस्त झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.