मादागास्करमध्ये स्टेडियममधील चेंगराचेंगरीत 15 ठार

अंटनानारिवो (मादागास्कर)- मादागास्करमधील एका स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये किमान 15 जण मृत्यूमुखी पडले आहेत. मालगसे प्रांताची राजधानी अंटनानरिवोमधील महामासिना स्टेडियममध्ये ही दुर्घटना घडली. या स्टेडियममध्ये बुधवारी स्वातंत्र्य दिनानिमित्तचा समारंभ आयोजित केला गेला होता. या समारंभाच्या निमित्ताने आयोजित मनोरंजनाच्या कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका मिळवण्यासाठी स्टेडियमवर पाहुण्यांची एकच गर्दी झाल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली.

मादागास्करचे अध्यक्ष आंद्रे राजोएलिना आणि या समारंभासाठी अतिथी म्हणून आलेले रवांडाचे अध्यक्ष पॉल काग्मे यांनी या दुर्घटनेमध्ये मरण पावलेल्यांबद्दल सहवेदना व्यक्‍त केली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेल्यांच्या पूर्ण वैद्यकीय खर्चाची जबाबदारी सरकार उचलणार असल्याची घोषणाही अध्यक्ष राजोएलिना यांनी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here