वानवडीत 15 करोनाबाधित सापडले

पुणे/वानवडी – वानवडी येथील शिंदे छत्री परिसरात करोनाचे 15 रुग्ण आढळले. त्यामुळे हा संपूर्ण भाग सील करण्यात आला आहे.

शिंदे छत्री परिसरातील काही रहिवाशांच्या करोनाच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला.दरम्यान, वानवडी पूर्णपणे बंद केल्याचा अफवा दिवसभर पसरत होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. पालिकेने याबाबत खुलासा करत फक्त शिंदेछत्री परिसरातील भाग सील केल्याचे जाहीर केले. आरोग्य निरीक्षक प्रदीपकुमार राऊत म्हणाले की, एखाद्या भागात जर 15 पेक्षा जास्त रुग्ण आढळले तर त्या परिसरात संसर्ग वाढू नये म्हणून हा संबंधित भाग बंद करण्यात येतो.

त्याप्रमाणे हा भाग बंद केला आहे. वानवडीमधील इतर भाग जाहीर केलेल्या वेळेत सुरू राहणार आहेत.
खडकीत आणखी चौघांना बाधा खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीमध्ये चौघांना करोनाची लागण झाली आहे. कसाई मोहल्ला, सुरती मोहल्ला येथील चौघांना लागण झाली आहे. यामध्ये एका गर्भवतीचादेखील समावेश आहे, तर, बोर्डाच्या एका सदस्याच्या भावाला देखील करोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

तर, कसाई मोहल्ला येथील 67 वर्षीय पुरुषाचा करोनामुळे मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबीयातील दोघांना लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या बोर्डाच्या हद्दीमध्ये एकूण 65 जणांना करोना संसर्ग झाला असून, आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.