श्रीनगर : जम्मू काश्मिरची पाहणी करण्यासाठी अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्टर यांच्यासह 15 देशांचे राजदूतांचे श्रीनगरमध्ये आगमन झाले. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये या राज्याचा विशेष दर्जा काढल्यानंतर प्रथमच राजनैतिक अधिकारी काश्मिरला भेट देत आहेत.
दिल्लीतून विशेष विमाने त्यांचे श्रीनगरला आगमन झाले. नव्याने स्थापन केलेल्या केंद्रशासीत प्रदेशातील अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. हे शिष्टमंडळ नायब राज्यपाल मुर्मू यांच्यासह नागरी शिष्टमंडळाची भेट घेतील. बांगलादेश, व्हिएतनाम, मालदिव, दक्षिण कोरीया, मोरोक्को आणि नायजेरीयांच्या राजदूतांचा यात समावेश आहे.
ब्राझीलचे दूत अँड्रे अऱ्हाना कोरेरीआ दो लोगो हेही या दौऱ्यात सहभागी होणार होते, मात्र अचानक उद्भवलेल्या कामामुळे त्यांनी माघार घेतली. युरोपीयन महासंघाच्या राजदूतांनी आपण नंतर भेट देऊ, असे सांगितले असून त्यांनी स्थानबध्दतेत असणारे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्या भेटीसाठी आग्रह धरला आहे.