जुन्नर : जुन्नर तालुक्यात गुरुवारी (दि. 30) नव्याने 15 रुग्ण आढळून आल्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या 415 झाली आहे. नव्याने वाढ झालेल्या बाधितांपैकी नारायणगाव (5), वडगाव कांदळी (3), राळेगण शिंदे (2) तर जुन्नर, वडज, बस्ती, तेजुर आणि ठिकेकरवाडी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
दरम्यान, लेण्याद्री येथील कोविड केअर सेंटर हे जुन्नर तालुक्यातील रुग्णांसाठी वरदान ठरले आहे. याठिकाणी विविध संस्था स्वयंस्फूर्तीने मदत करीत आहेत. युवासेनेचे जिल्हाप्रमुख गणेश कवडे यांनी येथील सर्व आरोग्य कर्मचारी, अधिकारी व रुग्णवाहिका चालक यांना उच्च दर्जाच्या फेस शिल्डचे वाटप केले आहे. तर भारत सॅनिटायझेशनच्या वतीने सॅनिटायझर स्टँड, नोझल पंप, ऑटोमॅटिक सॅनिटायझर, डीसइफेक्टंट स्प्रे पंप, हनसन जेल, स्प्रे पेन, सोडियम हायफोक्लोराईड तसेच दिशा व सूचना दर्शक फलक दिल्याची माहिती जितेंद्र पुंडे व फकीर आत्तार यांनी दिली.