१५ ऑगस्ट याच दिवशी भारताला का मिळाले ‘स्वातंत्र्य’

15 ऑगस्ट, भारतीय स्वातंत्र्याचा दिवस… देशात सगळीकडे भारतीय स्वातंत्र्याविषयी आणि इतिहासाविषयी मनमोकळेपणाने बोलले जात आहे. तसा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास हा फार मोठा आहे. मात्र 15 ऑगस्ट 1947 या तारखेलाच भारतीय स्वातंत्र्याचा दिवस म्हणून का साजरा केला असेल ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर जाणून घेऊ या 15 ऑगस्ट या दिवशी भारताला स्वातंत्र्य का मिळाले?

15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांनी देशाची राजवट भारतीयांच्या हाती देऊन या दिवशी देशाला स्वातंत्र केले होते. त्या वेळी ब्रिटिश संसदचे लॉर्ड माउंटबॅटन यांना 30 जून 1947 भारतीय राजवट भारतीयांना सोपविण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच  लॉर्ड माउंटबॅटन यांना शेवटचे व्हायसराय पदी नेमण्यात आले होते. त्यांनीच भारताच्या स्वातंत्र्य दिनाची तारीख ठरविली होती.

काही इतिहासकारांच्या मते, सी राजगोपालाचारी यांच्या सल्ल्याने लॉर्ड माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट या तारखेची निवड केली होती. सी. राजगोपालाचारी यांनी लॉर्ड माउंटबॅटन यांना सांगितले होते की, 30 जून 1947 पर्यंत थांबलो तर हस्तांतरित करण्यास कोणतीही शक्ती शिल्लक राहणार नाही. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी माउंटबॅटनने भारताच्या स्वातंत्र्यासाठी निवड केली होती. यानंतर 4 जुलाई 1947 रोजी ब्रिटीश हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतीय स्वातंत्र्य विधेयक आणले गेले. या विधेयकात भारताचे विभाजन आणि पाकिस्तान निर्मितीचा प्रस्ताव होता. हे विधेयक 18 जुलै 1947 रोजी मान्य केले गेले आणि 14 ऑगस्ट रोजी विभाजनानंतर, 15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री 12 वाजता, भारतीय स्वातंत्र्य घोषित केले गेले.

तर काही इतिहासकारांच्या मते, माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट या तारखेची निवड केली, कारण याचदिवशी दोन वर्षापूर्वी नॉर्थ कोरिया, साउथ कोरिया, ब्रह्मदेश आणि प्रजासत्ताक काँगो यांच्या सहयोगी सैन्यासमोर जपानने शरणागती पत्करली होती. म्हणून या सर्व देशांच्या बरोबर भारताचा स्वातंत्र्य दिन असतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here