मोदींना सवाल करणाऱ्या पोस्टरमुळे १५ लोकांना अटक; राहुल, प्रियंका गांधींनी तेच पोस्टर केलं शेअर

नवी दिल्ली – देशात करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे रुग्णांना प्राण गमवावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यासंदर्भात पावले उचलली होती. मात्र देशात लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.

यावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. या टीकेमुळे १५ लोकांना अटक झाली होती. आता तशीच टीका काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी केली आहे.


राजधानी दिल्लीत करोना लसीसंदर्भात सवाल उपस्थित करणारे पोस्टर्स अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी १५ लोकांना अटक केली. आता तेच पोस्टर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी शेअर केली आहे. पोस्टरवर लिहिलं होतं, ‘मोदीजी हमारे बच्चों की व्हॅक्सिन विदेश क्यों भेजी’, अर्थात मोदीजी आमच्या मुलाबाळांच्या वाट्याची लस परदेशात का पाठवली.

केंद्र सरकारने करोना प्रतिबंधक लसीचे अनेक लस परदेशात निर्यात केले होते. त्यामुळे केंद्र सरकारवर टीका होत आहे. याच पोस्टरला अनुसरून राहुल यांनी ट्विट केलं की, मलाही अटक करा. तर प्रियंका गांधी यांनी त्या पोस्टरला आपला प्रोफाईल पिक्चर बनवला.


दरम्यान ‘मोदीजी हमारे बच्चो की व्हॅक्सिन विदेश क्यों भेजी’ असा सवाल करणारे पोस्टर दिल्लीतील अनेक भागांमध्ये झळकले आहेत. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.