“सांड की आंख’साठी 15 ऍक्‍टर्सचा नाकार

अनुराग कश्‍यपच्या “सांड की आंख’मध्ये भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू या शार्प शूटरच्या रोलमध्ये दिसणार आहेत. या दोघींनी वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतर शार्प शूटर बनण्याचा निर्णय घेतला होता. या सिनेमातील लुक पुढे आल्यावर या रोलसाठी खरोखरच म्हाताऱ्या अभिनेत्रींना घ्यायला पाहिजे होते, अशी प्रतिक्रिया व्यक्‍त व्हायला लागली. मात्र या रोलसाठी 1,2 नव्हे तर तब्बल 15 अभिनेत्रींनी नकार दिला होता. या रोलसाठी 55 ते 60 वर्षांच्या अनेक अभिनेत्रींशी चर्चा झाली, मात्र स्क्रीनवर “म्हाताऱ्या’ बनणे त्यांना मान्य नव्हते.

एवढेच नाही, तर काही तरुण अभिनेत्रीही वयस्कर दिसण्यास फार उत्सुक नव्हत्या. मात्र भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नूने यासाठी उत्साहाने मंजूरीही दिली. 30 वर्षाची झाल्यावरही जर कॉलेज युवतीचा रोल केलेला प्रेक्षकांना चालू शकतो, तर वयस्कर रोल स्वीकारला तर आक्षेप का असावा, असा सवाल तापसीने केला. तर सिनेमात कलाकार नेहमीच आपल्या वयापेक्षा मोठ्या वयाचा रोल करतातच. “सारांश’मध्ये अनुपम खेर आणि “मदर इंडिया’मध्ये नर्गिसनीपण आपल्या वयापेक्षा मोठ्या वयाचा रोल केला होता, याची भूमीने आठवण करून दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.