पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून करोना रूग्ण संख्येचा आकडा स्थिर आहे. शनिवारी (दि.30) रोजी 1 हजार 84 नागरिकांची चाचणी केली. यामध्ये 147 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर 195 जण करोनामुक्त झाले आहेत.
शहरात आत्तापर्यंत 3 लाख 67 हजार 568 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर 4 हजार 625 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 982 रूग्ण सक्रीय असून यामधील 19 जण रूग्णालयात उपचार घेत आहेत.
तर 963 जण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. शहरात आतापर्यंत 37 लाख 15 हजार 726 जणांचे लसीकरण झाले आहे.