पुणे – मागील 24 तासांत खडकवासला धरणात 53 मिमी, पानशेतमध्ये 121 मिमी, वरसगावमध्ये 118 मिमी आणि टेमघर धरणात 120 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. आधीच धरणे काठोकाठ भरल्याने धरणात जमा होणारे पाणी सोडण्यात येत आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत या तीन धरणांतून खडकवासला धरणात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे खडकवासला धरणाचे सर्व दरवाजे उघडून नदीमध्ये 31 हजार 449 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने खडकवासला धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात आला. दिवसभरात 31 हजार 449 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
वेळ आणि विसर्ग प्रमाण (क्युसेक)
रात्री 2 – 13,981
पहाटे 4 – 18,451
पहाटे 5- 22,880
सायं. 8- 31,449