सातारा – जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 144 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर 5 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
या करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सातारा तालुक्यातील सातारा 1, शनिवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, करंजे 1, शाहुनगर 2, शाहुपुरी 2, कोडोली 1, दौलतनगर 1, अहिरे 1, हुमगाव 1, न्हावी बु 1, राहटणी 1, शिवथर 6, नेले 2, मालगाव 1, यादोगोपाळ पेठ 1, सैदापूर 1, चिंदणनगर 1,
कराड तालुक्यातील कराड 1, शनिवार पेठ 2, राजमाची 1, उंडाळे 1, मलकापूर 1,
पाटण तालुक्यातील मद्रुळ कोळे 1, भोसगाव 1, कुंभारगाव 2, मल्हार पेठ 1,
फलटण तालुक्यातील फलटण 5, तरडगाव 7, रविवार पेठ फलटण 1, राजुरी 1, गोळीबार मैदान फलटण 1, नाईकबोमवाडी 1, जाधववाडी 1, जिंती नाका 1, पवारवाडी 4, वडले 2, विढणी 1, सुरवडी 1, शिंदेवाडी 1, सासवड 1, पिप्रद 1, तातवडा 2, साखरवाडी 6, बीरदेवनगर 1,खामगाव 1, होळ 1, निंभोरे 1, सोमथळी 1,
खटाव तालुक्यातील खटाव 4,निमसोड 6, मायणी 2,वडूज 7, औंध 1, पोपालकरवाडी 1,मार्डी 1,
माण तालुक्यातील नरवणे 1, तडवळे 2, मलवडी 1,पांडे 1, म्हसवड 5,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 5, शिरंबे 1,
जावली तालुक्यातील वारोशी 2,
वाई तालुक्यातील आसले 1, धर्मपुरी 1, खेड 1, दासवडी 1, दत्तनगर वाई 1,
खंडाळा तालुक्यातील लोणंद 1,
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 3,
इतर 5, खराडेवाडी 2, सर्जापुर 1, धामणी 5
बाहेरील जिल्ह्यातील कडेगाव 2,
5 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांमधील माजगाव ता. सातारा येथील 61 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये धुळदेव ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष, ललगुण ता. खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, महिमानगड ता. माण येथील 85 वर्षीय पुरुष, आझादनगर ता. सातारा येथील 60 वर्षीय पुरुष एकूण 5 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
एकूण नमुने -250178
एकूण बाधित -51369
घरी सोडण्यात आलेले -48693
मृत्यू -1724
उपचारार्थ रुग्ण-952