पुणे, – प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम जनमन) या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार राज्याभरात नवीन १४३ अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी १७ कोटी १६ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.
या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी केंद्र बांधकामासाठी केंद्र शासनाकडून प्रतिअंगणवाडी रुपये १२ लाख याप्रमाणे १०० टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यानुषंगाने केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला आहे.
त्यापैकी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पित असलेला ८ कोटी १६ लाख रुपये निधी शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आला आहे. आता उर्वरित ९ कोटी निधी पोषण अभियानासाठीच्या लेखाशीर्षामधून वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
निधी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तांकडे वितरीत व खर्च करण्यासही मान्यता मिळाली असून, आयुक्तालयाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.