पुणे मेट्रोसाठी 478 कोटी रुपयांची तरतूद
24 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी 16 कोटी
मुंबई – विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सोमवारच्या पहिल्याच दिवशी सरकारने 24 हजार 723 कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यामध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना मदत म्हणून 16 कोटी 24 लाख रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर पुणे मेट्रोसाठी 476 कोटी रूपयांची व कृषिपंप व यंत्रमागांना वीज दरात देण्यात येणाछया सवलतीसाठी 1,417 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
वित्त मंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सन 2019-20 या वर्षाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या मागण्यांवर दोन दिवस म्हणजे 27 फेब्रुवारी आणि 2 मार्च असे दोन दिवस चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील. पुरवण्या मागण्यांमध्ये सर्वाधिक 15 हजार कोटी रूपयांची तरतूद शेतकरी कर्जमुक्तीसाठी करण्यात आली आहे.
कृषिपंप व यंत्रमागांना वीज दरात देण्यात येणाछया सवलतीसाठी 1,417 कोटी, तर एसटी बस मध्ये विविध वर्गांना देण्यात येणाऱ्या सवलतीच्या प्रतिपूर्तीसाठी 277 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्यासाठी 16 कोटी 24 लाख रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर राज्यातील रस्ते आणि पुलांच्या बांधकामासाठी 435 कोटी तर पुणे मेट्रोसाठी 478 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
होमगार्ड व पोलीस पाटलांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ केल्याने अनुक्रमे 100 व 95 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.