नवी दिल्ली: जागतिक आरोग्य संघटनेने ‘कोविड-19 च्या संदर्भात दिलेल्या सार्वजनिक आरोग्य व सामाजिक उपाययोजनांशी जुळवून घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना’ अंतर्गत संसर्गाचा संशय असलेल्या क्षेत्रांत अधिक तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे.
सर्वसमावेशक तपास या संकल्पनेबद्दल व संशयित रुग्णांच्या तपासणी बद्दल सांगताना जागतिक आरोग्य संघटनेने दर दहा लाख लोकसंख्येमागे प्रतिदिन 140 चाचण्यांची देशाला गरज असल्याचे म्हटले आहे. सध्या केंद्र सरकार व राज्यसरकारांच्या एकत्रित प्रयत्नातून दर दहा लाख लोकसंख्येमागे 140 किंवा त्याहून जास्त चाचण्या केल्या जात आहेत.
देशभरात कोविड-19 चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या वाढत असल्यामुळे चाचण्यांची संख्या वाढवण्यास मदत होत आहे. सरकारी क्षेत्रातल्या 865 प्रयोगशाळा आणि 358 खाजगी प्रयोगशाळा मिळून आता एकूण संख्या 1223 झाली आहे.
आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्यांची संख्या एक कोटी 24 लाख 12,664 इतकी आहे व ती सतत वाढत आहे दर दहा लाख लोकसंख्येमागे चाचण्यांची संख्या सतत वाढत असून ती आता 8,994 वर पोहोचली आहे.