कर्नाटकातील 14 बंडखोर आमदारांवर विधानसभा अध्यक्षांचा अपात्रतेचा ठपका

बंगळुरू : कर्नाटकातील राजकीय नाट्याचा शेवट काही होताना दिसत नाही कारण आता यात विधानसभा अध्यक्षांच्या एका निर्णयाची भर पडली आहे. अनेक राजकीय घडामोडीनंतर कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएसचे सरकर बहुमत सि÷द्ध करता न आल्याने कोसळले होते. त्यानंतर भाजपाने राज्यातील सत्तेची सुत्र हाती घेतली परंतु, आता भाजपाची खऱ्या अर्थाने सत्ता टिकवण्यासाठी कसोटी लागणार असल्याचे राज्यात एकूणच चित्र निर्माण झाले आहे.

बीएस येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी जेडीएस-कॉंग्रेसच्या 14 बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले आहे. तर यापूर्वीच विधानसभा अध्यक्षांनी 3 आमदारांना अपात्र घोषित केले होते. त्यामुळे आता अपात्र आमदारांची संख्या एकूण 17 झाली आहे. बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई केल्यानंतर विधनासभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी, मी कोणताही चालूपणा अथवा नाटक केलेले नाही, उलट अत्यंत सौम्यरित्या निर्णय घेतला आहे. शिवया 15 व्या विधानसभेची मुदत संपेपर्यंत अपात्र आमदार निवडणूक लढवू शकत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.