कर्नाटक विधानसभेतील 14 बंडखोर आमदार अपात्र

Bengaluru: Assembly Speaker KR Ramesh Kumar announces the disqualification of 14 rebel Congress MLAs under the anti-defection law, during a press conference in Bengaluru, Sunday, July 28, 2019. Speaker disqualified 14 more rebel MLAs under the anti-defection law till the end of the assembly term in 2023, a day ahead of Chief Minister B S Yediyurappa seeking the trust vote in the assembly to prove his majority. (PTI Photo/Shailendra Bhojak)(PTI7_28_2019_000069B)

विश्‍वास दर्शक ठराव मांडण्यापूर्वीच सभापतींची कारवाई

बेंगळूरु – कर्नाटक विधानसभेतील सभाप्ती के.आर. रमेश कुमार यांनी आज आणखी 14 बंडखोर आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याखाली विधानसभेची मुदत संपेपर्यंत (2023) अपात्र ठरवले आहे. नवनियुक्‍त मुख्यमंत्री बी. एस.येडियुरप्पा हे उद्या विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करणार आहेत. त्यापूर्वीच या आमदारांना अपात्र ठरवण्यात आले आहे.

कॉंग्रेसचे 11 आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे तिघे अशा एकूण 14 आमदारांना सभापतींनी अपात्र ठरवले आहे. घाईघाईने बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सभापतींनी आपल्या निर्णयाची घोषणा केली. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दोन दिवसांनी ही कारवई करण्यात आली आहे.

मात्र या कारवाईचा येडियुरप्पा यंच्या सरकारवर काहीही विपरीत परीणाम होणार नाही. सदस्यांना अपात्र ठरवल्यामुळे सभागृहातील सदस्यांची संख्याच कमी होणार आहे. अपात्र ठरवलेल्या आमदारांच्या अनुपस्थितीमुळे भाजपला फायदाच होणार आहे.

कुमारस्वामी यांच्या विश्‍वासदर्शक ठरावाच्यावेळी 17 बंडखोरांसह कॉंग्रेस, बसपा आणि अपक्ष असे प्रत्येकी 3 मिळून एकूण 20 आमदार अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे कुमारस्वामी सरकार अल्पमतात आले होते. आता 17 आमदारांच्या अपात्रतेमुळे सभागृहातील सदस्यसंख्या 224 झाली आहे. यामध्ये सभापतींचा समावेश नाही. मतदानाच्यावेळी समसमान मते पडली तर सभापतींना निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो.

भाजपकडे एका अपक्षासह 106 सदस्यांचे संख्याबळ आहे. कॉंग्रेसकडे 66. धर्मनिरपेक्ष जनता दलाकडे 34 आणि बसपाकडे एक आमदार आहे. मात्र विश्‍वासदर्शक ठरावाच्यावेळी कुमारस्वामी यांच्याबाजूने मतदान न केल्यामुळे बसपाच्या आमदाराची पक्षाकडून हकालपट्टी करण्यात आली आहे.

आपण आपली न्यायबुद्धी वापरली आहे. आपण 100 टक्के व्यथित झालो आहोत, असे सभापतींनी म्हटले आहे. भाजप सभापतींविरोधात अविश्‍वास ठराव आणण्याच्या हालचाली करत असल्यामुळेच सभापतींनी आमदारांना अपात्र करण्याचे पाऊल उचलले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)