मुंबई – मुंबई शहरातील धारावी परिसरात एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला असून यामध्ये १४ जण जखमी झाले आहेत. जखमींना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
#UPDATE | 14 people have been reported injured in the cylinder blast in Dharavi area of Mumbai: BMC
— ANI (@ANI) August 29, 2021
या घटनेची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून एएनआय वृत्तसंस्थेला देण्यात आली आहे. जखमी नागरिकांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे.
रविवारी दुपारच्या सुमारास धारावीत सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. धारावीतील शाहू नगर, कमला नगर परिसरात ही घटना घडली. एका घरात सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशामक दलाचे दोन बंब स्फोट झालेल्या परिसरात दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…