म्यानमारच्या 14 खासदारांना भारतात आश्रय?

नॉर्थ-ईस्ट स्टुडंट ऑर्गनायझेशन आग्रह

ऐझवाल – म्यानमारच्या १४ खासदारांनी मिझोराममध्ये आश्रय घेतला आहे. लष्करी तख्तपालटानंतर मिझोराममध्ये आश्रय घेणाऱ्या २२२३ लोकांमध्ये या खासदारांचाही समावेश आहे. एक पोलिस अधिकारी म्हणाले, सर्व खासदार म्यानमारच्या चिन राज्य व सांगाग क्षेत्रातील आहेत.

नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (एनएलडी) या पक्षाच्या तिकिटावर नोव्हेंबर २०२० मध्ये ते विजयी झाले होते. सर्व स्थलांतरित मिझोरामच्या ऐझवालसह ९ जिल्ह्यांत राहतात. त्यात ८० टक्के पोलिस कर्मचारी आहेत.

इतर २० टक्के सरकारी अधिकारी, शिक्षक, अग्निशमन इत्यादींचा समावेश आहे. बहुतांश स्थलांतरितांच्या भोजनाची व्यवस्था एनजीआेने केली आहे. नॉर्थ-ईस्ट स्टुडंट ऑर्गनायझेशनने केंद्र सरकारला एक आग्रह केला आहे. म्यानमारच्या स्थलांतरितांना पूर्वोत्तरमधील चार राज्यांत आश्रय देण्याची विनंती करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.