सातारा – जिल्ह्यातील महाबळेश्वर वगळता दहा तालुक्यात लंपी स्किन रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सोमवारअखेर 2134 जनावरे बाधित आढळली असून 158 जनावरांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी एका दिवसात जिल्ह्यात 14 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
नियमित औषधोपचाराने 535 जनावरे बरी झाल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली. सोमवारअखेर 2134 जनावरांना लंपी स्किनचा प्रादुर्भाव झाला असून सोमवारी दिवसात 14 जनावरांचा मृत्यू झाला आहे.