नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या गाडीचा 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण अपघात झाला. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाला आहे.
दिल्ली-डेहराडून महामार्गावर रेलिंगला धडकल्यानंतर ऋषभच्या कारला आग लागली. त्यानंतर परिसरातील उपस्थितांनी त्याला गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. या अपघातात ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. सध्या ऋषभ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करत आहे.
ऋषभ पंतसाठी सध्याचा काळ कठीण आहे. आता हळूहळू त्याच्या अडचणी कमी होतायत. क्रिकेटच्या मैदानापासून लांब ऋषभ सध्या आराम करत आहे. दोन पावलं चालण्यासाठी सुद्धा त्याला आधाराची गरज भासत होती. पंतला या कठीण काळात आपल्या जवळच्या माणसांची साथ मिळताना दिसत आहे.
View this post on Instagram
नुकतंच सुरेश रैना, हरभजन सिंग आणि एस श्रीसंतने ऋषभ पंतची भेट घेतली. रैना आणि श्रीसंतने फोटो शेअर केलाय, ज्यात पंतचा दुखापतग्रस्त पाय दिसतोय. या फोटोत पंतच्या चेहऱ्यावर हास्य आहे. त्याच्यासोबत हरभजन सिंग, सुरेश रैना आणि श्रीसंत हसताना दिसतायत. फॅन्सना हा फोटो भरपूर आवडलाय. सध्या हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल असून, पंत लवकरच रिकव्हरी करेल, असा विश्वास फॅन्स दाखवत आहे.
दुसऱ्या सर्जरीनंतर पूर्णपणे फिट होण्यासाठी ऋषभला 4 ते 5 महिने लागतील. त्यानंतर ऋषभचे रिहॅब आणि ट्रेनिंग सुरु होईल. मैदानावर परतून प्रॅक्टिस सुरु करण्यासाठी आणखी दोन महिने लागू शकतात. असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे.