राज्यात दरड कोसळून, मुसळधार पावसाने 138 जणांचा बळी

मुंबई  – राज्यात दरड कोसळून आणि मुसळधार वृष्टीने बळी गेलेल्यांची संख्या शनिवारी 138 वर पोहोचली. तर पूरग्रस्त असणाऱ्या सात जिल्ह्यातून तब्बल 90 हजारे लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे, अशी माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली.

दरम्यान मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी काल दरड कोसळलेल्या तळीये गावाला भेट देऊन पहाणी केली. या गावात दुपारपर्यंत 46 मृतदेह दरडीच्या ढिगाऱ्याखालून काढले होते. सांगली, कोल्हापूर सातारा, पुुणे, रत्नागिरी आणि रायगडचा तसेच ठाणे या सात जिल्ह्यांना पुराचा चांगलाच फटका बसला आहे.

सांगली जिल्ह्यात 42 हजार 573 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 40 हजार 882 जणांना हलवण्यात आले आहे. एकूण 89 हजार 333 नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले असून 59 जण अद्याप बेपत्ता आहेत. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नद्या धोक्‍याच्या पातळीवरून वहात आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.