134 शिक्षकांनी केली शासनाची दिशाभूल?

जिल्हा परिषद : बदली प्रकरणात दाखल केली खोटी माहिती

– सागर येवले

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – नेहमी खरे बोलावे… खरे वागावे अशी शिकवण देणारे शिक्षकच ज्यावेळी खोटेपणाने वागतात, त्यावेळी शिक्षकांवरचा विश्‍वासच उडतो. पुणे जिल्ह्यातील शिक्षक बदली प्रक्रियेत, जिल्हा परिषदेतील काही शिक्षकांनी राज्य शासनाला खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याची लवकरच पोलखोल होणार असून, त्यामध्ये साधारण 134 शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे.

राज्यात यंदा ग्रामविकास विभागाकडून ऑनलाइन पद्धतीने शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यासाठी संबंधित शिक्षकाला राज्य शासनाच्या संकेतस्थळावर असलेल्या अर्जांमध्ये सर्व माहिती देणे बंधनकारक होते. माहितीनुसार संवर्ग-1, 2, 3 आणि 4 च्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये 6 हजार 43 पैकी 5 हजार 388 शिक्षक, उपशिक्षक, पदवीधर आणि मुख्याध्यापक यांच्या बदल्या झाल्या. तर 655 शिक्षक विस्थापित राहिले.

ज्यांना शाळा मिळाल्या नाही त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामविकास विभागाला निवेदन देऊन बदली मिळण्याबाबत विनंती केली. तसेच जिल्ह्यातील संवर्ग-1, 2 आणि 3 मधील काही शिक्षकांनी खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केल्याचा आरोप विस्थापित शिक्षकांनी केला. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी शिक्षकांनी भरलेली माहिती आणि कागदपत्रे याची तपासणी करण्यात येईल. त्यामध्ये जे शिक्षक दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अवघड क्षेत्रात पाठविले जाईल, असे आश्‍वासन देण्यात आले. त्यानुसार मांढरे यांनी तालुकानिहाय शिक्षकांच्या कागदपत्रांची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये जवळपास 134 शिक्षकांनी खोटी माहिती दिल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या शिक्षकांवर आता कोणत्या प्रकारची कारवाई होणार, त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे याची पोलखोल लवकरच होणार आहे.

अंतर, पती-पत्नीचा लाभामध्ये अधिक शिक्षकांचा समावेश
बदली प्रक्रियेत अर्ज भरताना दोषी आढळलेल्या शिक्षकांमध्ये बहुतांश शिक्षकांनी पती-पत्नीचा लाभ, एस.टी.चे अंतराचे खोटे दाखले तसेच आजाराचे सक्षम कारण नसलेले दाखले दिलेले नाही. त्यामुळे या शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. आता कारवाई कशाप्रकारची असेल या विचारानेच शिक्षकांमध्ये धडकी भरलेली आहे. यातील काही शिक्षकांना अवघड क्षेत्रात जावे लागणार हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)