नवी दिल्ली: भाऊबीज निमित्त दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने महिलांना डीटीसी बसमध्ये मोफत प्रवासाची भेट दिली आहे. तसेच या घोषणेसोबत दिल्ली सरकारने महिला सुरक्षा सुरक्षेला प्राधान्य देत 13 हजार मार्शल डीटीसी बसमध्ये तैनात केले आहेत.
यापूर्वी बसमध्ये मार्शल तैनात करण्यात आले होते. परंतु पूर्वी त्यांची संख्या 3 हजार चारशे होती. आणि ते काही खास बस, मार्ग आणि संध्याकाळच्या बसमध्ये तैनात होते, पण आता दिल्लीच्या सर्व डीटीसी आणि क्लस्टर बसमध्ये मार्शल तैनात करण्यात आले आहेत.
दिल्ली सरकारने दिलेल्या घोषणेनंतर मंगळवारी सकाळपासून मार्शल बसेसमध्ये दिसतात. बसेसच्या आत स्टिकर्सही लावण्यात आले आहेत, ज्याद्वारे महिलांना त्रास देणाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे. ज्यावर ‘सावधान! एखाद्या महिलेला छेडण्याचा प्रयत्न करू नका. या बसमध्ये मार्शल उपस्थित आहे’, असे लिहले आहे.