तामिळनाडूत राहुल गांधींचे फिटनेस दाखवित 9 सेंकदात 13 पुशअप्स

चेन्नई – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या राजकीय भूमिकांची जशी चर्चा होते तशीच त्यांच्या फिटनेसचीही नेहमीच होत असते. राहुल गांधी सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर असून या ठिकाणीही त्यांच्या फिटनेसची पुन्हा एकदा चर्चा रंगली. केवळ फिटनेसची चर्चाच रंगली नाही तर राहुल यांनी अवघ्या 9 सेकंदात 13 पुशअप्स मारून आपला फिटनेस दाखवून दिला.

निमित्त होते एका शाळेतील कार्यक्रमाचे. राहुल गांधी हे तामिळनाडूच्या दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी कन्याकुमारी येथे रोड शो केला. त्यानंतर त्यांनी एका शाळेत येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांशी गप्पा मारता-मारता त्यांनी आयकिदो हा मार्शल आर्टचा प्रकार विद्यार्थ्यांना करून दाखवला. त्यानंतर मेरोलिन शेनिघा नावाच्या विद्यार्थीनीने त्यांना पुशअप मारण्याची विनंती केली. राहुल गांधी यांनीही मागे-पुढे न पाहता तत्काळ पुशअप्स मारण्यास सुरुवात केली.

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओत राहुल गांधी पुशअप्स मारताना दिसत आहेत. अवघ्या 9 सेकंदात 13 पुशअप्स मारताना ते दिसत आहेत. त्यानंतर या विद्यार्थीनीने त्यांना एका हाताने पुशअप्स मारायला सांगितले. राहुल यांनी या विद्यार्थीनीची ही इच्छाही पूर्ण करत एका हाताने पुशअप्स मारले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.