इसिसच्या 13 दहशतवाद्यांना विविध मुदतीचा तुरूंगवास

नवी दिल्ली – इसिस या खतरनाक दहशतवादी संघटनेचे सदस्य बनलेल्या 13 दोषींना शुक्रवारी विशेष न्यायालयाने पाच ते दहा वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली. भारतात दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी इसिसचे जाळे निर्माण करण्याचा कट रचल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आले.

न्यायालयाने नफीस खान याला सर्वांधिक दहा वर्षे तुरूंगवास ठोठावला. तिघांना सात वर्षे, एकाला सहा वर्षे, तर उर्वरित आठ दोषींना पाचे वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे, बेकायदा कारवाया करणे आदी गुन्ह्यांबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आले. संबंधित प्रकरणात सोशल मीडियाच्या माध्यमातून तरूणांना दहशतवादी मार्गावर नेण्याचे प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले.

तरूणांना चिथावण्याचे पहिले ऑनलाईन प्रकरण म्हणून त्याकडे पाहिले जाते. संबंधित प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) डिसेंबर 2015 मध्ये गुन्हा दाखल केला. त्यानंतर काही महिन्यांनी एनआयएकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. आता एनआयएच्या तपासामुळे आरोप सिद्ध होऊन दोषी ठरलेल्यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.